बुधवार, ११ मे, २०१६

शिकायचे असेल तर शाळेच्या या सात मनोगंडातून बाहेर या.



शिकण्याच्या प्रक्रियेच्या आड येणाऱ्या सात गोष्टी.

मी काल एक सुंदर लेख वाचला.


संदर्भ:

आपण मुलांची ची खरच "शाळा" करून टाकतो. हा लेख शिकण्या आड येणाऱ्या गोष्टी बाबत सावध करु बघतो. यातून सुटका करून घेतली तरच काही शिकाल असे प्रतिपादन करतो.

१. मी एका कन्वेयर बेल्ट वर बसलो आहे. आता मी आपोआप पुडे जाईन. आपोआप माझ्यावर प्रक्रिया होईल आणि मी एक तयार वस्तू बनून बाहेर पडेन .
२. परवानगी मिळावी. मला जे काही करायचे आहे त्यासाठी मी परवानगी मिळावी याच मी वाट पाहीन.
३. मी विद्यार्थी आहे. माझ्याकडून जगात जे घडते, जसे घडते तसे होनार नाही. माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघा.
४. शिक्षक हा "शिक्षक" आहे. तो सर्वज्ञ, परिपूर्ण, आदर्श, तयार, वगैरे वगैरे असतो.
५. एक आदर्श कामगार जसा आपले काम आणि आपण या पलीकडे बघत नाही तसेच आपणही वागले पाहिजे.
६. मधली सुट्टी हीच वेळ मनासारखे वागण्याची असते. इतर वेळी मनाला पटो, न पटो, आवडो न आवडो, सोपवलेल्या गोष्टी करीत राहिल्या पाहिजेत.
७. मोठा झाल्यावर कोण होणार? हे डोक्यात भिनवून लहानपणापासून विषय निवडून शिकले पाहिजे.

http://fee.org/articles/seven-ways-school-has-imprisoned-your-mind/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा